राजस्थानचा पंजाबवर सहा गडी राखून विजय

आयपीएल-6 मधील 18व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहा गडी आणि चार चेंडू राखून विजय मिळवला.

जयपूर- आयपीएल-6 मधील 18व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहा गडी आणि चार चेंडू राखून विजय मिळवला. विजयासाठी 125 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 19. 2 षटकात चार बाद 126 धावा केल्या.

अजिंक्य रहाणे (नाबाद 34), राहुल द्रविड (9), वॉटसन (32), स्टुअर्ट बिन्नी (0), ब्रॅड हॉज (15) आणि संजू सॅमसन (नाबाद 27) धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या द्रविडचा निर्णय राजस्थान संघातील गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरला. श्रीशांतने आपल्या पहिल्या आणि संघाच्या दुस-या षटकांत दोन फलंदाज बाद करुन किंग्ज इलेव्हन पंजाबला जोरदार झटका दिला. सिद्धार्थ त्रिवेदीने पंजाबचा कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टचा झेल घेतल्याने तो शून्यावरच बाद झाला. तर दुसरा सलामीवीर मनदीप सिंगचा देखील स्टुअर्ट बिन्नीने झेल टिपला. त्याने अवघ्या दोन धावा केल्या. त्यानंतर आलेले फलंदाज झटपट बाद करुन राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला अवघ्या 124 धावांवर रोखले.

जेम्स फॉल्कनर, के कूपर, सिद्धार्थ त्रिवेदी आणि श्रीशांतने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मनन व्होरा आणि प्रविण कुमार धावबाद झाले.

Leave a Comment