सलमान शिवाय कैटरीना अपूर्ण

बॉलीवूड मध्ये कैटरीना आणि सलमानच्या अफयेरची बरीच चर्चा होती. मात्र कैटरीना कैफ तसे काही नाही असे सांगून टाळत होती. मात्र शेवटी कैटरीना कैफने सलमानशिवाय ती अधुरी असल्याचे मत व्यक्त केले. कैटरीना कैफने एका इंटरव्यूवेळी ही बाब स्पष्ट केली. आज जे काही आहे त्यामध्ये सलमानचा मोठा वाटा असल्याचे तिने स्पष्ट केले.

बॉलीवुडमध्ये सलमान आणि कैटरीनाच्या नात्याची खूप दिवसपासून चर्चा आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सलमान आणि कैटरीना यांचे संबध थोडेसे बिघडले आहेत. मात्र इंटरव्यूवेळी कैटरीनाने जीवनात सलमान खानची जरूरत असल्याचे स्पष्ट केले आहे.

या सर्व प्रकारामुळे आता कैटरीनाला पुन्हा त्याची गरज असल्याचे वाटते. यापूर्वी ती लहान मोठी गोष्ट सलमानला विचारत होती. त्या दोघाची दोस्ती खूप जुनी आहे. कैटरीनाचे करियर पुढे घेऊन जाण्यात सलमानचा मोठा हात आहे. त्यामुळेच सलमानच्या संपूर्ण कुटुंबाचे कैटरीनाने आभार मानले आहेत.

Leave a Comment