संतोष मानेला फाशी

पुणे: बेदरकार बस चालवून नऊ बळी घेणारा एसटी चालक संतोष मने याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी मानेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, गंभीर जखमी करणे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांसाठी मानेला दोषी ठरविण्यात आले.

माने याने दि. २५ जानेवारी रोजी स्वारगेट एसटी आगारातून बस चोरली आणि शहरात बेदरकार फिरून नऊ जणांचा बळी घेतला. त्याचा प्रमाणे ३० हून अधिक जणांना जखमीही केले.

ही घटना घडली त्यावेळी मानेचे मानसिक संतुलन ढळल्याचा दावा करण्यात आला. डॉ. दिलीप बुरटे यांनी त्याचे मन:स्वास्थ्य ठीक नसल्याची साक्ष दिली होती. मात्र घटन घडली त्यापूर्वी आणि नंतर दोन दिवस मानेची मन:स्थिती सामान्य असल्याचे नमूद करून न्यायालयाने डॉ. बुरटे यांच्यावर ताशेरे ओढले.