जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची रविवारी सागर पार्क मैदानावर सभा होत आहे. मात्र या सभेत त्यांचे टार्गेट कोण? असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार दिवसपासून ते उत्तर महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. येथील परिस्थितीची पाहणी त्यांनी केली आहे. राज ठाकरे व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या जळगाव दौर्यामुळे शहरात व्हीव्हीआयपींसोबतच कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकार्यांची गर्दी झाली आहे. शासकीय विश्रामगृहे अपूर्ण पडत असल्यामुळे खासगी हॉटेल्स व विश्रामगृहे फुल्ल झाली आहेत.
आज सभा; राज ठाकरे यांचे टार्गेट कोण?
राज ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून ओंकारेश्वर व शिव कॉलनी फीडरवरील भारनियमन रविवारी दिवसभर राज ठाकरेंच्या सभेमुळे रद्द करण्यात आले असल्याचे क्रॉम्प्टनच्या सूत्रांनी सांगितले.राज ठाकरे यांना पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीला आवरताना पोलिसांना ‘लाठी’ चालवावी लागली. राज ठाकरे हे शनिवारपासून जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत, तर विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी ९ एप्रिल रोजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या राज्याच्या दौ-यातील ही शेवटची सभा असल्याने या सभेत ते काय बोलणार व कोणाला टार्गेट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपशी येत्या काळात जुळवून घेणार की टार्गेट करणार हे याठिकाणच्या सभेतून सपष्ट होणार आहे. त्यामुळे याची सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे.
