पुणे,दि. 6 (प्रतिनिधी)-यापुढे विधीमंडळाच्या जागा भरण्याची वेळ येईल तेव्हा राष्ट्रवादी वाल्मिकी समाजाला प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सफाई कामगार सेल व सफाई मजदूर काँग्रेस यांच्या राज्यस्तरीय महासंमेलनात केलेे. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार जयदेवराव गायकवाड,महापौर वैशाली बनकर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव चांगरे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चरणसिंह टाक, डॉ.सुधाकरन पणीकरन मदन बाफना, सुरेश घुले, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेवक सुनील गोगले, मीना परदेशी आदी उपस्थित होते.
विधान परिषदेसाठी पहिली जागा मेहेत्तर समाजाला -शरद पवार
शरदराव पवार म्हणाले की, सामाजिक दृष्ट्या मेहतर वाल्मिकी समाज वंचित असून उपेक्षित व्यवसाय करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कष्टाची त्यागाची भूमिका घेऊनही या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळत नाही.मात्र, या समाजाला वेदनेतून संकटातून बाहेर काढण्यासाठी पक्षातर्फे सर्व प्रयत्न केले जातील. तसेच या समाजाला सत्तेत स्थान मिळावे यासाठी आमच्या पक्षामध्ये विशेष लक्ष दिले जाईल. सफाई कामगारांच्या कामात स्थिरता यावी यासाठी या क्षेत्रातील ठेकेदारी पद्धत बंद केली पाहिजे यासाठीही पाठपुरावा केला जाईल.
वसंतराव चव्हाण यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.ते म्हणाले, त्यांच्या नंतर यापुढील काळात या समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व दिले जाईल. समाजातील काही उपेक्षित घटकांना अद्याप त्यांचा वाटा मिळालेला नाही. त्यामुळे बिहार राज्यातील उपेक्षितांमधील अतिउपेक्षितांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. महाराष्ट्रात मेेहत्तर-वाल्मिकी समाजाला असा वाटा मिळावा यासाठी पक्षातर्फे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
महासंमेलनातंजूर करण्यात आलेल्या ठरावांच्या पूर्ततेसाठी पक्षातर्फे सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मधुकर पिचड यांनी दिले. तर कर्मचार्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्याचा स्वच्छतामंत्री या नात्याने मी पाठपुरावा करील , असे आश्वासन लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिले. यावेळी महापौर वैशाली बनकर व वासुदेव चांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. चरणसिंह टाक यांनी अधिवेशनातील ठराव मांडले. डॉ.सुधाकरण पणीकरन यांनी आभार मानले.
