अण्णाच्या आवाहनानंतर केजरीवाल आज उपोषण सोडणार

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आवाहनानंतर केजरीवाल आज संध्याकाळी पाच वाजता उपोषण सोडणार आहेत. केजरीवाल हे पंधराव्या दिवशी उपोषण सोडतील. दिल्ली सरकार वीज कंपन्यांना फायदा पोहोचवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याच्या निषेधार्त केजरीवाल २३ मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.

गेल्या काही दिवसपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये भरमसाठ येणा-या वीज आणि पाण्याच्या बिलाविरोधात केजरीवाल मागील चौदा दिवसांपासून उपोषणावर आहेत. दोन दिवसापुर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून उपोषण सोडण्याचं आवाहन केल होत. त्यामुळे केजरीवाल यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली सरकार वीज कंपन्यांना फायदा पोहोचवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. त्याविरोधात केजरीवाल यांनी २३ मार्चपासून दिल्लीच्या सुंदरनगरी भागात उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान केजरीवाल शनिवारी संध्याकाळी पाच वाजता उपोषण सोडणारअसल्याचे विश्वसनीय सुत्रकडून समजते.