वीरेंद्र सेहवागच्या खेळण्याबाबत सस्पेन्स

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज घरच्या मैदानावर खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. या सामन्यात सेहवागच्या खेळण्याबाबत अद्याप निश्चित काही नाही, अशी माहिती डेव्हिड वॉर्नरने प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.

सेहवागच्या खेळण्याबाबत दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा मोर्न मोर्केल अद्याप पूर्णपणे फिट झाला नाही. त्याची पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. सूत्रांनुसार तो ९एप्रिलपर्यंत टीममध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध शनिवारी दिल्लीत होणा-या सामन्यात सेहवाग खेळेल असे वाटत होते पण अजून तो दुखापातीतून सावरला नाही.

दिल्लीसाठी सर्वाधिक धावा काढणार्‍या वीरेंद्र सेहवागच्या नावे गेल्या सत्रात सलग पाच अर्धशतके ठोकण्याचा विक्रम नोंद आहे. सेहवाग अद्याप पाठीच्या दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळे आगमी काळात सेहवाग लवकर फिट व्हावा यासाठी सर्वच जन त्याच्या दुखापतीची काळजी घेत आहेत.

Leave a Comment