ओबामा पगारातील ५ टक्के रक्कम परत करणार

वॉशिग्टन दि. ४ – अमेरिकेला कधी नव्हे ते भेडसावू लागलेले आर्थिक संकट आणि त्यामुळे अर्थसंकल्पात खर्चात करावी लागत असलेली कपात लक्षात घेऊन राष्ट्रभावनेतून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पगारातून पाच टक्के रक्कम ट्रेझरीला परत करण्याचा निर्णय जाहीर केला असून या महिन्यापासूच ओबामा चेकद्वारे ही रक्कम ट्रेझरीकडे जमा करणार आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षांना वर्षाला ४ लाख डॉलर्स म्हणजे रूपयांत दोन कोटी रूपये पगार मिळतो. त्यातील पाच टक्के म्हणजे दर महिना २० हजार डॉलर्स ओबामा परत करणार आहेत. म्हणजे दहा लाख रूपये ते परत देणार आहेत. व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जे कर्नी यांनी ही माहिती दिली आहे.

कर्नी म्हणाले की अमेरिकेच्या अध्यक्षांचा पगार हा अन्य काँग्रेस मेंबर्स प्रमाणेच कायद्याने ठरविलेला असतो त्यात बदल करता येत नाही. तरीही देशावरील भावी आर्थिक संकट लक्षात घेऊन अध्यक्षांनी आपल्या पगारातील कांही भाग देशासाठीच परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओबामांनी ही घोषणा करण्याच्या अगोदर एकच दिवस आधी अमेरिकेचे संरक्षण सचिव चक हेगेल यांनीही असाच निर्णय जाहीर केला आहे तर सिनेटर मार्क बोगिच यांनीही त्यांच्या पगारातील कांही रक्कम ट्रेझरीकडे परत करण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment