विवेकची पहिली पसंती विद्याला

आगामी काळात फिल्मकार विवेक अग्निहोत्री टी सीरीजसाठी महिलाच्या सबलीकरण विषयावर आधारित सिनेमाची निर्मित करित आहे. या सिनेमातील महिलेच्या मुख्य भूमिकेसाठी त्याने अभिनेत्री विद्या बालनला पहिली पसंती दर्शविली आहे. याबाबात विवेकने अभिनेत्री विद्या बालनकडे विचरणा केली असुन तिचा होकार आल्यास या सिनेमाचे काम लवकरच सुरु होणार आहे.

‘धन धना धन गोल’ सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्रीने केले आहे. या सिनेमासाठी विवेकची पहिली पसंत विद्या बालन आहे. मात्र तिने आगमी काळात ‘कहानी’ या सिनेमात काम केले नाहीतर या सिनेमात काम करण्यास ती तयार होणार आहे. सध्या विद्याच्या अभिनयाला सुट होईल अशी पटकथा तयार करण्याच्या विचारत तो आहे. त्याने या सिनेमासाठी विद्याशिवाय अन्य अभिनेत्रिशी संपर्क साधला आहे.

विवेक अग्निहोत्री म्हणाला,’ आगामी काळात येत असलेला त्याचा सिनेमा वर्तमान काळातील समाज आणि महिलासोबत होत असलेल्या तंत्राबाबत असून त्याशिवाय सस्पेंस असलेला हा एक रोमांचकरी सिनेमा आहे. या सिनेमासाठी पत्नी पल्लवी जोशीची निवड करणार काय असे विचरले असता तो म्हणाला, ‘ पल्लवी माझ्यासोबत ‘बुड्ढ़ा इन ए ट्रैफिक जैम’ या सिनेमात काम करित आहे.’