रणबीर दीपिकाचा पुन्हा रोमांस

काही दिवसानंतर का होइना सत्य समोर आले आहे. गेल्या काही दिवसपासून एक्स लवर्स रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये पुन्हा रोमांस सुरु झाल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. या अफवाला ख-या अर्थाने हवा मिळाली ती ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमाच्या शुटिंग पासून मात्र आता रणबीर कपूरने सत्य स्वीकारले असून त्यांनी गेल्या काही महिन्यापासून अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत डेट करीत असल्याचे सांगून टाकले आहे.
अशा कोणत्यापण अफवा नसून हे सर्व सत्य आहे असे खुद रणबीर कपूरने एक प्रेस कॉन्प्रेंसमध्ये कबूल केले आहे.

एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये रणबीरकडे दीपिकासोबत असलेल्या रिलेशन व दोघे मिळून सिनेमा प्रोमोट करनार काय याबाबत विचरणा करण्यात आली असता रणबीर म्हणाला,’ दोघे जन सध्या मॉनसून वेडिंग प्लान करीत आहोत.’ हे रणबीर सांगत असताना त्याठिकाणी दीपिका उपस्थित नव्हती.

सध्या ऋषि कपूर आणि नीतू सिंह रणबीर आणि दीपिकाच्या निर्णयामुळे खुप खुश आहेत. त्यामुळे सध्या ते मुलाच्या एक ग्रैंड मैरेजचा प्लान करीत आहेत. गेल्या आठवड्यात रणबीर आणी दीपिकाला सोबत होळी खेळताना काही जणांनी पहिले होते. दोघेपण सिनेमाच्या कास्ट आणि क्रू सोबत होळी खेळण्यासाठी आले होते. दोघे ऐक्टर रियल लाइफमध्ये आणखीन एक चांस घेत असतील तर दोघेपण ख-या ट्रैकवर आहेत म्हणण्यास काही हरकत नाही. त्यामुळे आगामी काळात बॉलिवुडच्या या हॉट कपलची मॉनसून वेडिंग आम्हाला लवकर पाहण्यास मिळणार आहे.

Leave a Comment