लेखी आश्वासन मिळेपर्यंत सुरुच राहणार प्राध्यापकांचा संप

मुंबई, दि.3- सरकारच्या घोषणेनंतरही प्राध्यापक आपल्या काही मागण्यांवर ठाम आहेत. लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे एम-फुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने म्हटलं आहे. संघटनेच्या या भूमिकेमुळे प्राध्यापकांचा संप लवकर मिटण्याची शक्यता धूसर झाली आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या संपाचा आजचा 60 वा दिवस आहे. राज्य सरकारने प्राध्यापकांना पंधराशे कोटी देण्याची तयारी दाखवली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजे टोपे यांनी विधानपरिषदेमध्ये प्राध्यापकांसाठी पंधराशे कोटी देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही प्राध्यापक संघटना लेखी आश्वासनावर अडून बसली आहे. प्राध्यपकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार मध्यस्थी केली. पवारांनी मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारनं प्राध्यापकांचे 500 कोटी रुपये दिल्यानंतर उर्वरित 80 रक्कम देऊ, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. संपकरी प्राध्यापकांच्या एकूण तेरा मागण्या आहेत. त्यासाठी 60 दिवसांपासून संप सुरु आहे. सरकारने प्राध्यापकांची 1500 कोटीची थकबाकी तातडीने द्यावी. 19996 ते 2000 दरम्यान नोकरीस लागलेल्या प्राध्यापकांना नेट-सेट बंधनकारक असू नये. असा आग्रह प्राध्यापकांनी धरला आहे. त्यातील 1500 कोटी देण्याची मागणी सरकारने मान्य करुनही प्राध्यपक लेखी आश्वासनावर अडले आहेत.

Leave a Comment