नवी दिल्ली दि.२ – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या आठवड्यातच वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. अर्थात काँग्रेसने त्याबाबत कांहीही जाहीर केलेले नाही तसेच सोनिया गांधी यांच्या परदेश दौर्याेची तारीखही जाहीर केलेली नाही.
सोनिया गांधी यांच्यावर परदेशात ऑगस्ट २०११ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्या पुन्हा चेकअपसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये परदेशात गेल्या होत्या. सोनिया गांधी यांच्यावर कसली शस्त्रक्रिया झाली याचा कोणताही उल्लेख कधीच करण्यात आलेला नाही. त्या पुन्हा चेकअपसाठी परदेशात जात आहेत आणि त्यांच्या अनुपस्थित पक्षाची धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी हेच सांभाळणार असल्याचेही या सूत्रांकडून समजते.