बी टाउन मधून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अजय देवगन आणि शाहरुख खान यांच्या सिनेमातील टक्कर झाली होती. त्यानंतर आता येत्या काळात अभिनेता रणबीर कपूरचा ‘बेशरम’ आणि सलमान खानच्या ‘मेंटल’ या सिनेमात टक्कर होणार आहे. मात्र माझी कोणाशी स्पर्धा नाही असे सांगून अभिनता रणबीर कपूरने काही दिवसांपासून सुरु असलेल्या अफवावर पडदा टाकला आहे.
माझी कोणाशी स्पर्धा नाही – रणबीर
तसे पहिले तर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली ही सिनेमाची चर्चा सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्यातील संबध बिघडवण्यास कारणीभूत ठरेल असे वाटत होते. सलमानच्या ‘मेंटल’ आणि रणबीरच्या ‘बेशरम’ च्या रिलीजची तारीख एक आहे. हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहेत.
सलमानच्या ‘मेंटल’या सिनेंमाची शूटिंग अजुन पूर्ण झाली नाही. त्यामुळे याबाबत आताच काही मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. त्यामुळेच सलमान अजून तरी गप्प बसला आहे. मात्र रणबीरने सलमानसोबत काप्टीशन नसल्याचे सांगून टाकले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अफवावर पडदा पडला आहे.
