शकील आफ्रिदींची सुटका होईपर्यंत पाकची मदत थांबवा

वॉशिग्टन दि.२३ – रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर आणि २०१६ च्या अध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणून परिचित असलेले रँड पॉल यांनी सिनेटरच्या बैठकीत घटना दुरूस्ती सचविली असून पाकिस्तानची आर्थिक मदत थांबविली जावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनला शोधताना आणि त्याच्यावरील हल्ल्याला मूर्त स्वरूप देताना ज्या पाकिस्तानी डॉक्टर शकील आफ्रिदीची मोलाची मदत मिळाली त्याची पाकिस्तानने तुरूंगातून सुटका करून त्याच्या सुरक्षेची खात्री दिल्याशिवाय पाकिस्तानला आर्थिक मदत दिली जाऊ नये.

पाकिस्तानने शकिल आफ्रिदीला ओसामा हत्येनंतर तुरूंगात डांबले असून त्याचा छळ केला जात आहे. पाकिस्तानची ही भूमिका कोणत्याच देशासाठी सोईची नाही. ज्यांना अमेरिकन करदात्यांच्या पैशातून एक डॉलरचीही मदत हवी आहे, त्यांनी तर अशी भूमिका घेताच कामा नये यासाठी कायद्यात सुधारणा करायला हवी.

Leave a Comment