नवी दिल्ली- कांगारूविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात जलदगती गोलंदाज इशांत शर्माने सुरुवातीला दोन धक्के देऊन बॅकफुटवर नेले. त्यानंतर पुन्हा अश्विन व जडेजाने धक्के देत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची घसरण उडाली आहे.शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ऑस्ट्रेलियाने ५ बाद ११७ धावा, केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया पुन्हा बॅकफुटवर
चौथ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मायकल र्क्लाकचा अंतिम अकरामध्ये समावेश नसून त्याच्याऐवजी शेन वॉटसन नेतृत्त्व करणार आहे. भारताचा अजिंक्य रहाणे पदार्पण करणार आहे. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला होता. त्यामुळे रहाणेला संधी मिळाली.
सामना सुरु झाल्यानंतर इशांतने सर्वप्रथम डेव्हीड वॉर्नरला बाद केले. डेव्हीड वॉर्नरला त्याने शुन्यावर बाद केले. वॉर्नरने ऑफ साईडला मोठा फटका मारला. परंतु, बॅटची कड घेऊन चेंडू विराट कोहल्याचा हातात स्लिपमध्ये विसावला. त्यानंतर धोकादायक ठरू पाहणा-या फिलीप ह्युजेसचा त्याने त्रिफळा उडविला. ह्युजेसने ४५ धावा काढल्या. पहिली विकेट झटपट पडल्यानंतर त्याने कोवानसह अर्धशतकी भागीदारी करुन डाव सावरला. परंतु, मोठी खेळी करण्यापासून त्याला इशांतने रोखले. धोकादायक ठरू पाहणारा तर कोवानला आश्विने बाद केले. तर जडेजाने कर्णधार शेन वॉटसनला बाद केले. तर मॅथ्यू वेडला आश्विने बाद केले.
ऑस्ट्रेलिया संघात ब्रॅड हॅडीनच्या जागेवर मॅथ्यू वेड यष्टीरक्षक म्हणून परतला तर जेम्स पॅटींसन आणि मिशेल जॉन्सन,ग्लेन मॅक्सवेलचा यांचाही समावेश करण्यात आला.
