सोहा अली जाणार बॉयफ्रेंडसोबत थायलंडला

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या रोमान्सची चर्चा सिनेसृष्टीत जोरात सुरु आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार दोघेजण लवकरच सुट्टी घालविण्यासाठी थायलंडला जात आहेत. हे दोघेजन आगामी काळात लवकरच लग्न करणार असल्याने काहीवेळ एकत्रित घालवता यावा या उदेशाने सुट्टीवर जात असल्याचे समजते.

यापूर्वी सोहा अलीचा भाऊ अभिनेता सैफ अली खान लग्नाच्या पूर्वी अभिनेत्री करीना कपूर सोबत सुट्टी घालविण्यासाठी नेहमीच विदेश दौ-यावर जात होता. काही दिवसापुर्वीच सैफ आणि करीनाने लग्न केले आहे. त्यमुळे आगामी काळात सोहा आणि कुणाल सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याचे समजते. त्यामूळे त्यांना एकत्रित फिरण्यास घरच्या मंडळीकडून परवानगी मिळाली आहे.

तसे पहिले तर काही दिवसापूर्वीच सोहा आणि कुणाल यांनी त्यांच्या करियरवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे एकदा करियर मजबूत झाले की दोघेपण लग्नाचा विचार करणार आहेत. मात्र सध्यस्थितीत दोघांचे करियर पहिले तर दोघापैकी एकजण पण अजूनपण सेट झाले नाही. त्यामुळे करियरची वाट पाहत बसल्यास दोघांनापण बराच काळ लग्नाशिवाय राहवे लागणार असे दिसते.

Leave a Comment