पती पत्नीची दोन मुलासह आत्महत्या

मुबई-वडाळ्यातील भक्तीपार्क या वसाहतीत एका फ्लॅटमध्ये चार मृतदेह आढळले. पती, पत्नीसह दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. हा प्रकार आत्महत्येचाच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकारामुळे वडाळा भागात खळबळ माजली आहे. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याबाबत शेजारी तसेच नातेवाईकांकडून काही माहिती मिळते का याचा तपास सध्या पोलिस करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलांच्या तोंडाला पिशव्या बांधण्यात आलेल्या आहेत. नवरा, बायकोने मुलांना मारून नंतर स्वत:चे जीवन संपवले असण्याची शक्यता पोलिसांना वर्तविलली आहे. चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

वडाळा-भक्तीपार्क येथील ओडीसी इमारतीत ही घटना घडली. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा केला असून या कुटुंबाबाबत शेजारी तसेच नातेवाईकांकडून माहिती घेतली जात आहे. मात्र यासर्व प्रकाराबाबत पोलीसाना अधिक तपशील मिळालेला नाही. त्यामुळे खून की आत्महत्या याबद्दल गूढ कायम आहे. शवविच्छेदन आवहाल प्राप्त झाल्यानंतर याचे रहस्य उलगडेल.

Leave a Comment