चित्रपदार्पण पुरस्कारात ‘खेळ मांडला’ची बाजी

पुणे, दि. 18 (प्रतिनिधी) – मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदितांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मराठी चित्रपट परिवारातर्फे आयोजित तिसर्‍या चित्रदर्पण पुरस्कारांमध्ये ‘खेळ मांडला’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकवला. तर ‘सतरंगी रे’ आणि ‘श्री पार्टनर’ हे चित्रपट सर्वाधिक पुरस्कारांचे मानकरी ठरले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उषा जाधव हिने पटकावला.
मराठी चित्रपट परिवारच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्काराचे वितरण सोमवारे रंगतदार सोहळ्यात अभिनेता पुष्कर जोग, निर्माते मेधराज राजेभोसले, इम्पाचे संचालक विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘श्री पार्टनर चित्रपटासाठी समीर सुर्वे यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार याच चित्रपटासाठी पद्मनाभ बिंड यांना मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘धग’ चित्रपटासाठी उषा जाधव यांना तर ‘श्री पार्टनरमसाठी श्‍वेता पगार या दोघींना विभागून देण्यात आला.
अजय नाईक (सतरंगी रे) आणि क्षितीज वाघ (येड्यांची जत्रा) यांना सर्वोत्कृष्ट संगितकाराचा पुरस्कार मिळाला. नॉन फिल्म म्युझिक अल्बम ‘तू मी अन् पाऊस’ हा अल्बम उत्कृष्ट ठरला. तर हर्षिद अभिराज आणि केतकी माटेगावकर या दोघांना नकाशी आल्बमसाठी सर्वोत्कृष्ट संगितकार आणि गायिकेचा पुरस्कार मिळाला.