
सॅमसंग या दक्षिण कोरियन कंपनीचा बहुप्रतिक्षित गॅलेक्सी एस फोर १४ मार्चला रिलीज केला गेला. या स्मार्टफोनची शॅडो इमेज कंपनीने प्रसिद्ध केली असून तो थोडा गॅलॅक्सी एस थ्री प्रमाणेच दिसतो आहे मात्र तो आकाराने थोडा मोठा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हा स्मार्टफोन बाजारात आयफोन पाचशी स्पर्धा करेल. या स्मार्टफोनचा स्क्रीन अपग्रेड करण्यात आला असल्याने तो बाजारातील मोस्ट हाय डेफिनेशन मोबाईल ठरेल असा कंपनीचा दावा आहे.
