मोहाली- तिस-या कसोटीमध्ये पहिला दिवस पावसामुळे धुऊन गेल्यानंतर शुक्रवारी अखेर तिस-या कसोटीमध्ये खेळ सुरु झाला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर निर्धाराने खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दमदार शतकी सलामी दिली. पहिल्या सत्रातटीम इंडियाला यश मिळाले नसून डेव्हीड वॉर्नर आणि कोवान यांनी दमदार फलंदाजी केली. उपहाराला खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने बिनबाद १०९ धावांपर्यंत मजल मारली होती.
तिस-या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे कालचा दिवस वाया गेल्यामुळे आज अर्धा तास आधी खेळास सुरुवात झाली. पहिल्या दोन कसोटीच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर निर्धाराने खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दमदार शतकी सलामी दिली. पहिल्या सत्रात भारताला यश मिळाले नसून डेव्हीड वॉर्नर आणि एड कोवान यांनी जम बसविला आहे. वॉर्नरने उपहारापूर्वी अखेरच्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. उपहाराला खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने बिनबाद १०९ धावां केल्या होत्या. वॉर्नर ५४ तर कोवान ४३ धावांवर खेळत होते.
पहिल्या दोन कसोटी सामन्याच्या तुलनेत टीम इंडियाची गोलंदाजी काहीसी निष्प्रभ ठरली. डेव्हीड वॉर्नरने स्थिरावल्यानंतर काही फटके मारले. इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार निष्प्रभ ठरले. कुमारने काही प्रमाणात चांगली गोलंदाजी केली. फिरकी गोलदाजाना अजून तरी फारसा प्र्बाह्व दाखविता आला नाही.