बॉलीवुड एक्ट्रेस करीना कपूरने जरी काही दिवसापूर्वीच लग्न केले असले तरी तिने बोल्ड व इंटिमेट सीन करण्यास आतापर्यंत तर नकार दर्शविला नाही. आगामी काळात येत असलेल्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात ती अभिनेता अजय देवगन सोबत काही बोल्ड सीन करताना दिसणार आहे. यापूर्वी देखील करीनाने अजय सोबत ‘ओमकारा’ या सिनेमात काही इंटिमेट सीन शूट केले होते.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार करीना प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात काही इंटिमेट सीन देण्यासाठी राजी झाली आहे. या सिनेमाच्या कथानकानुसार दोघामध्ये एक इंटिमेट सीन शूट केला जाणार आहे. प्रकाश झाने या सीनबाबत करीनासोबत चर्चा केली. या सिनेमातील स्टोरीची डिमांड असल्याने करीना हा सीन करण्यास तयार झाली आहे.
तसे पहिले तर करीना आणि अजय या सीनसाठी पूर्णपणे कम्फर्टेबल आहेत. कारण की त्याने यापूर्वी अशास्वरूपाचा सीन शूट केला आहे. या बहुचर्चित सीनची शूटिंग पुढच्या महिन्यात भोपाल मध्ये होणार आहे. काही दिवसापूर्वीच बेबोने एक एक्ट्रेससाठी लग्न करणे म्हणजे काही गुन्हा नव्हे असे म्हटले होते. त्यामुळे ती अशा प्रकारचा सीन करणार की नाही यावरून बरीचसी चर्चा रंगली होती.