चंदिगढ दि. १५ – चीपमेकर इंटेल ने त्यांच्या व्यवसायवाढीसाठी भारतावर लक्ष्य केंद्रीत केले असून त्यांचा चौध्या जनरेशनचा कोअर प्रोसेसर या वर्षाच्या मध्याला म्हणजे जून किवा जुलैत भारतात सादर करणार असल्याचे साऊथ एशिया डायरेक्टर संदीप अरोरा यांनी सांगितले.

अरोरा म्हणाले की नवीन प्रोसेसरला कमी वीज लागेल आणि तो अधिक चांगले काम करेल. फेशियल किवा गेश्चर ओळख अॅप्लीकेशनसह हा प्रोसेसर येत आहे. भारतात पीसी, स्मार्टफोन व टॅब्लेट बाजारावर इंटेलने लक्ष केंद्रीत केले आहे. भारतात वैयक्तीक संगणक आणखी पाच ते सात वर्षे तरी मागणीत राहणार आहेत. भारत सरकारने जाहीर केलेल्या आय टी पॉलिसी नुसार घरटी एक माणूस डिजिटल साक्षर असावा असा प्रयत्न होत आहे. हाच वर्ग इंटेलचा प्रमुख ग्राहक असेल यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.
उत्तर भारतात पंजाब हरियानासह इंटेलचे १००० टेक्नॉलॉजी पुरवठादार असून हे ग्राहकांशी थेट संपर्क साधत आहेत असेही अरोरा म्हणाले.