सलमान खानची लिफ्टमनला धमकी

मुंबई: नेहमी वादाच्या भोवर्‍यात अडकणारा अभिनेता सलमान खान आता नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये लिफ्टमन म्हणून काम करणार्‍या ६५ वर्षीय लॉरेन्स फाल्कन यांनी आपल्याला सलमानने नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

फाल्कन यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात सलमानविरोधात तक्रार दाखल करुन सुरक्षेची मागणी केली आहे.
फाल्कन यांनी तक्रारीत म्हटले आहे की; गेल्या महिन्यात सलमान खानने त्याला बोलावून इशारा दिला की, तू माझ्या पैशांमुळे श्रीमंत झाला आहेस. जर तू माझे म्हणणे ऐकले नाहीस, तर तुला नोकरीवरुन काढून टाकण्यात येईल. या तक्रारपत्रावर फाल्कन आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे.

वांद्य्रातील चिंबई परिसरात राहणारे फाल्कन गेल्या चाळीस वर्षांपासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये नोकरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी फाल्कनच्या कुटुंबियांनी सलमान खानच्या अंगरक्षकांनी त्रास दिल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment