मीना कुमारींच्या जीवनावर म्युझीकल नाटक ‘एक तनहा चॉंद’

पुणे: महजबीन बानो उर्फ मीना कुमारी हिचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईत झाला. तर मृत्यू ३१ मार्च १९७२ रोजी वयाच्या फक्त ४० व्या वर्षी झाला. ‘द ट्रॅजिडी क्वीन’ हे बिरुद लाभलेल्या मीना कुमारीने ३३ वर्षाच्या कारकिर्दीत ९३ चित्रपटात अभिनय केला असला तरी ‘साहिब बिबी और गुलाम’मधील तिची ‘छोटी बहू’ही भूमिका अक्षरश: ती जगली आहे.

मीना कुमारी यांना आपल्या कारकिर्दीत ‘परिणिता १९५३), ‘बैजू बावरा (१९५४), ‘साहिब बिबी और गुलाम (१९६३)’, ‘काजल’ (१९६४), या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तर अशा रुपसंपन्न व अभिनयसम्राज्ञी अभिनेत्रीच्या जीवनावर ‘स्काय व्होक्स थिएटर ग्रुप’एक हिंदी नाटक रंगमंचावर घेऊन येत आहे ते म्हणजे ‘एक तनहा चॉंद’.

‘एक तनहा चॉंद’ या नाटकात मीना कुमारीची भूमिकेत रुबी एस साई आहेत. कुरेशी (अम्मान मियाँ), आनंद प्रभू (रौफ लाला) तर कमाल अमरोही आणि रेहमान या भूमिकेत अनुकमे इरफान सिददीकी व बंकार अली दिसणार आहेत.

या नाटकाचे लेखन, संकल्पना, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनेत्री अशी सगळयाच बाजू एकहाती पेलवल्यात रुबी एस साई यांनी. या नाटकाचे सहाय्यक दिग्दर्शक आहेत सागर गुज्जर, तर कला दिग्दर्शक आहेत गुरप्रीत कौर. यातील देखणा सेट उभारलाय अंकुश कांबळी आणि संगीत दिलंय संदीप डांगे यांनी.

‘स्काय व्होक्स थिएटर ग्रुप’ पस्तुत मीना कुमारीच्या जीवनावरील ‘एक तनहा चॉंद’ या नाटकाचा पुढील पयोग हा २९ मार्च रोजी रविंद्र नाटय मंदीर, प्रभादेवी येथे होणार आहे.