मार्चमध्ये टोयोटाची एटिऑस नव्या रूपात सादर

नवी दिल्ली दि. ११ – टोयोटा किलोस्कर या मोटर उत्पादक कंपनीने त्यांची एटिऑस आणि एटिऑस लिवा ही उत्पादने मार्च अखेरी भारतात नव्याने उतरविण्याचा निर्णय घेतला असून या गाड्या वितरकांकडे पोहोचत्या झाल्या असल्याचेही समजते. कंपनीच्या इनोव्हा आणि फॉर्च्यूनर या गाड्यांनी भारतीय ग्राहकांची जितकी पसंती मिळविली त्यात तुलनेत इटिऑस ग्राहकांच्या पसंतीस फारशी उतरली नाही. त्यामुळे ग्राहकांच्या नाराजीची नोंद घेऊन कंपनीने या दोन्ही मॉडेल्समध्ये काही बदल केले असल्याचे कंपनी सूत्रांकडून समजते.

या दोन्ही गाड्या हचबॅक प्रकारातील आहेत. या गाड्यांच्या खिडक्या, दारे, इंटिरियरमध्ये अनेक बदल केले गेले असून या गाड्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास कंपनी व्यवस्थापनाने दाखविला आहे.