काराकास – आपले लाडके अध्यक्ष हयुगो चावेझ यांच्या निधनाच्या धक्कयातून व्हेनेझुएला हळूहळू सावरू लागला असून १४ एप्रीलला हा देश आपल्या पुढील अध्यक्षांची निवड करेल.
व्हेनुझुएलाचा नवीन अध्यक्ष एप्रीलमध्ये
देशात राजकीय वादविवादांना उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही घोषणा केली. व्हेनेझुएलाच्या घटनेनुसार अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत नवीन अध्यक्षांची निवड होणे बंधनकारक आहे.
पाच मार्चला चावेझ यांचे निधन झाले होते. यानंतर महिन्याची मुदत संपल्यावर नवीन अध्यक्षांची निवड होईल. दरम्यान, टीकाकारांनी शुक्रवारी रात्रीच उपाध्यक्ष निकोलस माडुरो यांना हंगामी नेते म्हणून शपथ दिल्याबद्दल तक्रार केली. कर्करोगामुळे चावेझ यांचे निधन झाले.
