स्टँप पेपर होणार हद्दपार

मुंबई: स्टँप पेपर आता हद्दपार होणार आहेत. याबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

स्टँप ड्युटीची रक्कम आता थेट बँकेत जाऊन भरावी लागणार आहे. बनावट स्टॅम्प पेपर आणि त्यामुळे होणारे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

बनावट स्टँप पेपरमुळे अब्दुल करीम तेलगीच्या हजारो कोटीच्या घोटाळ्यासह अनेक मोठे घोटाळेही उघडकीस आले आहेत. त्यामुळे आता स्टॅम्पपेपरंच हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave a Comment