अश्लील सिनेमे हिट होत नाहीत-अजय

‘गोलमाल’, ‘बोल बच्चन’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘सिंघम’ सारखे हिट सिनेमा करणा-या अभिनेता अजय देवगनने कौटुंबिक आणी मनोरंजक सिनेमे केली आहेत. अजयचे जवळपास सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर सफल ठरले आहेत.

याबाबत अधिक बोलताना अभिनेता अजय देवगण म्हणाला, ‘अश्लील दृश्य आणि तंग कपडे घालून केलेली सिनेमे हिट होत नाहीत. अश्लील सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत नाहीत. हा माझा आजपर्यतचा अनुभव आहे. सध्या ट्रेंड बदलला असून कौटुंबिक आणी मनोरंजक सिनेमे प्रेक्षकांना आवडतात व तशीच सिनेमे हिट होतात असा अनुभव आहे.’

अभिनेता अजय देवगनने एक एंटरटेनमेंट चैनल सोबत नुकताच ४०० कोटीचा करार केला आहे. या डीलनुसार स्टार इंडियाकडे अजयचे २०१८ पर्यंत रिलीज होणा-या सिनेमाचे एक्सक्लूसिव सैटेललाइट राइट्स असणार आहेत. गेल्या काही दिवसापासून अजयची रिलीज झालेली सर्व सिनेमे हिट झाले आहेत. या सिनेमाने १०० कोटीपेक्षा अधिकची कमाई केली आहे.

Leave a Comment