उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा – मायावती

लखनौ – गेल्या काही दिवसापासून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या काळात राज्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट झाल्याचे सांगतानाच महिला पोलिस अधिकारी झिया-उल-हक यांच्या हत्येत सपाचे मंत्री राजा भैया यांचा सहभाग असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे संकेत दिले आहेत.

पोलिस उपअधीक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणात अडकल्यानंतर उत्तर प्रदेशचा मंत्री रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजाभय्याने सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजाभय्याच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी काही पोलिस अधिका-याना निलबीत करण्यात आले आहे.

प्रतापगड जिल्ह्यात एका सरपंचाची हत्या झाल्यानंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात झिया-उल-हक यांचा शनिवारी मृत्यू झाला. अखिलेश यादव यांनी हक यांच्या देवोरिया या मूळ गावी जाऊन त्यांची पत्नी परवीन आझाद यांचे सांत्वन केले. आझाद यांनी त्यांच्याकडे हत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. यादव यांनी ही मागणी स्वीकारली जाईल, असे आश्वासन दिले. या ठिकाणी अजूनही तणावाचे वातावरण आहे.

Leave a Comment