मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा अपघात; सात ठार

मुंबई: मुंबई-पुणे पुन्हा महामार्गावरील भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे कराडहून ठाण्याकडे जाणारी भरधाव सुमो ट्रेलरवर धडकली. ही घटना कळंबोलीजवळ पहाटे तीनच्या सुमारास घडली. यामध्ये सुमोतील ७ जण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे पुन्हा महामार्गावर सुरु असलेले अपघाताचे हे द्रष्टचक्र थांबण्याचे नाव घेत नाही. अपघातात मृत्यूमूखी झालेले सर्व जण कराडचे आहेत.

कळंबोलीजवळ ज्याठिकाणी मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे संपतो त्याच ठिकाणी या सुमोला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला एक ट्रेलर उभा होता. चालकाचे सुमोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरवर जाऊन सुमो आदळली. सुमोमध्ये दहा जण होते. ते कराडहून ठाण्याला चालले होते.

अपघातात मृत्यूमूखी झालेले सर्व जण कराडचे असून अन्य तीन जखमींची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे पुन्हा महामार्गावरील अपघाताचेप्रमान कमी व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही अपघाताचे हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.

Leave a Comment