उत्तरप्रदेशचे मंत्री राजा भैया यांचा राजीनामा

डीएसपी मर्डर केसमधील वाद वाढल्यानंतर उत्तरप्रदेशचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैयाने मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षाने दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री अखि‍लेश यादव यांच्याकडे राजा भैयाने राजीनामा पाठविला आहे. मुख्यमंत्री अखि‍लेश यादवने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

डीएसपी जिया उल हक यांची पत्नीने घरीच धरणे आंदोलना सुरु केले आहे. राजा भैयाला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा त्यानी दिला आहे. प्रतापगढ़चे नवीन एसपी एल आर कुमारने इंस्‍पेक्‍टरसह आठ पुलिस कर्मचारी निलंबित केले आहेत. प्रतापगढ़ जिल्ह्यातील कुंडाचे आमदार राजा भैया ने डीएसपीच्या हत्‍येचा प्रकार दुर्भाग्‍यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील कुंडाच्या वलीपूर गावात सरपंचाची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस उपअधीक्षकाला जिवे मारले. पोलिस व ग्रामस्थांच्या धुमश्चक्रीत सरपंचाचा भाऊदेखील मारला गेला. सरपंच नन्हे यादवच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी ठाण्याला घेराव घालत पोलिसांवर गोळीबार केला. दीड तास चाललेल्या चकमकीत टुंडा येथील उपअधीक्षक झिया उल हक आणि सुरेश यादव यांचा मृत्यू झाला. सहा पोलिस व ३५ग्रामस्थ जखमी झाले. गावात सध्या तणाव असून, अलाहाबादहून पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव सरकारमधील मंत्री राजाभय्या यांचा कुंडा हा मतदारसंघ आहे. प्रकरणात त्यांच्या चालकाच्या नातलगाचे नाव आहे.

Leave a Comment