बलात्कार करून निर्घृण हत्या

यवतमाळ: दारव्हा तालुक्यातील हुचेगावात एकतर्फी प्रेमातून एका १७ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून अमानुष खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

आरोपी फुलसिंग राठोड (वय २३) आणि पीडित युवती दोघेही शेजारी रहात होते. फुलसिंगला दारूचे व्यसन होते. आपले प्रेम असल्याचे सांगून तो युवतीला त्रास द्यायचा. यावरून अनेकदा त्याला पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी समजही दिली होती.

गुरुवारी फुलसिंगने मुलीला गावाच्या बाहेर एकटी गाठले व तिच्यावर बलात्कार केला. दोघांमध्ये प्रचंड झटापट झाली. त्यानंतर संतापाच्या भरात फुलसिंगने एका मोठ्या दगडाने ठेचून मुलीची हत्या केली. त्यानंतर तो पळून गेला.

पोलिसांनी याप्रकरणी बलात्कारासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.