सलमान रश्दी अल कयदाच्या रडारवर

लंडन: मूळ भारतीय असलेले ब्रिटीश लेखक सलमान रुश्दी हे अल कायदाच्या रडारवर ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असल्याचे अल कायदाच्या इंग्रजी ऑनलाईन मासिकात जाहीर करण्यात आले आहे. इस्लाम धर्माची जो अवहेलना करतो असे या मूलतत्त्ववाद्यांना वाटते; त्यांचे नाव या यादीत टाकले जाते.

‘पाहिजे आहे: इस्लामच्या विरोधात अपराध करणारा; जिवंत वा मृत!’ असा मथळा असलेला लेख या मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. वॉशिंग्टन डिसी येथे स्थित मिडल इस्ट मिडिया रिसर्च इंस्टिट्यूटने हे ऑनलाईन मासिक शोधून काढले.

‘दी सॅटेनिक वर्सेस’ या पुस्तकात इस्लामविरोधी लेखन केल्याबद्दल लेखक रूश्दी यांच्या विरोधात यापूर्वीही म्हणजे १९८९ मध्येही इराणचे दिवंगत नेता खोमेनी यांनी ङ्गतवा काढला होता.

Leave a Comment