ओसामा बिन लादेन नावाचा शिक्षक?

लखनौ दि. २४ – समाजवादी नेते अखिलेश यादव यांचे सरकार उत्तरप्रदेशात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अनेक सुधारणा करायला सुरवात केली. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि एकूण प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी शिक्षक भरती ऑनलाईन करण्याची योजना या सुधारणेचाच एक भाग. मात्र आता ही सुधारणा सरकारच्या चांगलीच अंगाशी आली आहे.

त्याचे झाले असे की प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या ७२८२५ जागा भरायच्या होत्या. त्यासाठीची भरती प्रक्रीया ऑनलाईन सुरू करण्यात आली तेव्हा तब्बल सात लाख अर्ज त्यासाठी आले. मात्र तपासणीत त्यातले ६० टक्के अर्ज बोगस असल्याचे निष्पन्न झाले. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी भन्नाट माहिती दिली होती.एकाने आपले नांव अल कायदाचा म्होरक्या ओसाबा बिन लादेन असेच दिले होते व वडिलांचे नांव या जागी बिल क्लिंटन अशी माहिती भरली होती. दुसर्यावने वडिलांचे नांव एक्सवायझेड असे भरले होते व स्वतःचे नांव अेबीसीडी भरले होते. तिसरा स्वतःचे नांव फर्जी व वडिलांचे नांव फर्जीसिग असल्याची माहिती देत होता. फर्जीचा अर्थच बोगस असा आहे.

या बोगस उमेदवारांची शैक्षणिक पात्रता मात्र वादातीत होती. कारण यातील सर्वांनाच सर्व परिक्षांत आणि सर्व विषयात १०० पैकी १०० म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे त्यांची प्रमाणपत्रे सांगत होती. सगळ्यात कडी म्हणजे राज्य प्राथमिक शिक्षण विभागाने या सर्व उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबरही दिले आणि मुलाखतीला येण्यासाठीची पत्रे रवाना केली. मात्र उमेदवारांप्रमाणेच त्यांचे पत्तेही खोटे असल्याने मुलाखतीला खरी माहिती दिलेलेच कांही उमेदवार आले असेही समजते.

राज्याचे शिक्षण राज्य मंत्री वसीम अहमद यांनी ऑनलाईन भरती प्रक्रियेत कांही त्रुटी राहिल्या असल्याचे सांगून झाल्या प्रकाराची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment