राजधानीत सात वर्षीय बालिकेवर बलात्कार

नवी दिल्ली: धावत्या बसमध्ये युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या कटू स्मृती विस्मरणात जाण्यापूर्वीच राजधानीत आणखी एक भयानक घटन उघडकीस आली आहे. अज्ञात नराधमाने सात वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या आवारातच बलात्कार केला.

ही घटना दिल्लीतील मंगोलपुरी भागातील महानगर पालिकेच्या शाळेत गुरुवारची रात्र ते शुक्रवारची सकळ या दरम्यान घडली असावी; असा पोलिसांचा कयास आहे. पीडीत विद्यार्थिनीच्या अंगावर जखमांच्या अनेक खुणा असून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही विद्यार्थिनी आरोपीबाबत कोणतीही देऊ शकत नसल्याने पोलिसांसमोरील आव्हानात भर पडली आहे. या प्रकरणी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.