‘बिग बी’ने धुतले होते करीनाचे पाय

बॉलीवुडचा महानायक अमिताभ बच्चन सध्या दिवसभर ब्लॉगवर आतापर्यंत झालेल्या काही आठवणी शेअर करीत असतात. यावेळी त्यांनी अभिनेत्री करीना कपूरचे देखील नाव घेतले आहे. करीना लहान असताना त्यावेळी ‘पुकार’ सिनेमाच्या सेटवर आली होती. त्या शूटिंगवेळी बिग बीने लहान असलेल्या करीना सोबत बराच वेळ घालविला होता.

अमिताभ जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, ‘ पुकार सिनेमाची शुटींग सुरु होती. त्यावेळी लहान असलेली करीना तिचे वडील रणधीर कपूर सोबत सेटवर आली होती. यावेळी पुकार सिनेमाची शूटिंग रणधीर कपूर व बिग बी एकत्रित करीत होते. त्यावेळी करीना कपूर सेटवर आली होती. या सिनेमातील एका सीनचे शूट सुरु होते. त्यावेळी रणधीर कपूरची विलनकडून मार खावा लागत होता. करीना हा सीन पाहून लगेचच वडिलांना वाचवण्यासाठी वेगाने पाळली. तिला वाटले की ही फाइट खरोखरच सुरु आहे. त्यावेळी ती पळत गेल्याने करीनाच्या लहान पायांना माती लागली होती. त्यावेळी पाण्याने मी तिचे पाय धुतले होते. त्या घटनेची आठवण मला आजपर्यंत असल्याचे बिग बीने स्पष्ट केले आहे.

काही दिवसापूर्वी बच्चन आणि कपूर परिवारातील संबध काहीसे बिघडले होते. करीनाची बहिण अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत अभिनेता अभिषेक बच्चनचा होणारा विवाह काही कारणाने मोडला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून झाले गेले विसरून हे दोन परिवार एकत्रित येताना दिसत आहेत. आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक प्रकाश झाच्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात अभिनेत्री करीना आणि महानायक अमिताभ एकत्रित काम करीत आहेत.

Leave a Comment