अर्थसंकल्प; कही खुशी, कही गम…

नवी दिल्ली: दरवर्षी सादर केल्या जाणार्‍या अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या तर काही निराशाजनक बाबींचा समावेश केला जातो. म्हणजेच कही खुशी, कही गम अशी परिस्थिती असते. त्यामुळे २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या सामान्य जनतेच्या हाती निराशाच आली आली. कारण आयकरासह इतर करांच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे मात्र महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणी केली आहे.

यामध्ये अतिश्रीमंतावरचा कर वाढला असला तरी मध्यमवर्गीयांना मात्र अर्थमंत्र्यांनी दिलासा दिलेला नाही. एक कोटींहून अधिक उत्पन्न असणार्‍यांवर आता १० टक्के अधिक कर आकारण्यात येणार आहे. भारतात ४२ हजार ८०० लोकांचे उत्पन्न एक कोटी पेक्षा अधिक आहे. तर दोन ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांना दोन हजारांची सूट देण्याची घोषणा पी. चिदंबरम यांनी केली.

मात्र अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. महिलांसाठी ९७ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याशिवाय भारतात पहिल्यांदाच महिलांसाठी बँक अस्तित्त्वात येणार असून कर्मचारी, सभासद आणि ग्राहकही महिलाच असणार आहेत.

हॉटेलमधलं जेवण महागणार आहे. त्याचबरोबर परेदशी कार, मोटारसायकल, परदेशी औषधं, परदेशी आणि देशी मोबाईल, सिगरेट, सिगार, सिल्क या वस्तू महागणार आहेत. तर चामड्याच्या वस्तू, ज्वेलरी आणि महागडे खडे आणि सूती कापड स्वस्त होणार आहेत.

जागतिक मंदीचा परिणाम भारतावर होत आहे. मात्र मंदीतून भारत लवकरच बाहेर पडेल असेल विश्वास पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला आहे. तसंच मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मंदावली; असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य-

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट आहे.

पहिल्यांदा गृहकर्ज घेणार्‍यास 25 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी एक लाख रुपये कर सवलत मिळणार.
तयार कपडे स्वस्त होणार. मोटारसायकल, महागड्या गाड्या महागणार. मार्बल महागणार.
औषधही महागले.

आगामी सार्वत्रिक निवडणुका समोर ठेऊन सर्वसामान्यांना गोंजारण्यासाठी अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत; तर करांमध्येही काहीही बदल करण्यात आलेले नाही.

महिलांचा राजकारणातील वाढता सहभाग लक्षात घेता महिलांसाठी मोठ्या प्रमाणात अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत.
तयार कपडे स्वस्त होणार, सोने स्वस्त होणार, कृषी परिक्षण प्रकिया स्वस्त होणार, जहाज वाहतूक स्वस्त होणार, सिंगल स्क्रिन सिनेमा दर स्वस्त होणार, चामड्याच्या वस्तू बनविणार्‍या मशीन स्वस्त होणार, परदेशी बूट स्वस्त होणार, चामड्याच्या जोड्यांवर निर्यात करात घट असणार.

या अर्थसंकल्पात चांदी, वातानुकुलित हॉटेल्स, सिगारेट आणि सिगार, आयात केलेले रेशीम, २ हजारांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाईल, परदेश बाईक्स, परदेशी गाड्या, टीव्हीचा सेट टॉप बॉक्स महागणार आहेत.

Leave a Comment