पाच भाषेत बोलणार अजय देवगण

बॉलीवुडचा ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगन आता आगामी काळात येणा-या ‘हिम्मतवाला’ या सिनेमात पाच वेगवेगळ्या भाषेत बोलणार आहे. दिगदर्शक साजिद खान सध्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमाचा रिमेक तयार करीत आहे. अभिनेता अजय देवगन बंगाली, गुजराती, मराठी, पंजाबी आणि तमिल भाषेत बोलताना दिसणार आहे.

याबाबत बोलताना साजिद म्हणाला, ‘ अभिनेता अजय देवगन या सिनेमातील एक विशेष दृश्यामध्ये पाच भाषेत बोलणार आहे. या दृश्यामध्ये हीरोइन तमन्ना ही काही गुंडाची धुलाई करण्यास अजय देवगणला सांगते. हे गुंडे पंजाब, तमिलनाडु, गुजरात, महाराष्ट्र आणि बंगालशी संबधित असल्याने त्या गुंडाना त्यांच्या भाषेत आव्हान देण्यासाठी अजय देवगन या पाच भाषेचा वापर करणार आहे. तो काही एक शब्दाचा वापर करणार नाही तर बरचसा संवाद त्याने केला आहे. ‘

अजयने या भाषेचा उच्चार समजन्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. या सिनेमासाठी अजयने गेल्या काही दिवसापासून खूप मेहनत घेतली आहे. त्याचा ‘हिम्मतवाला’ हा सिनेमा येत्या २९ मार्च रोजी रिलीज होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment