गृहमंत्र्यांनी घेतला ठाकरे बंधुंचा समाचार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांच्या धमक्यांना आपण जुमानत नाही आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची तर मला कीव येते; अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला.

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील अनेक मंत्री तसेच पक्षप्रमुख दौर्‍यावर आहेत. त्या दौर्‍यादरम्यान ठाकरे बंधूंनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टीका करण्याचे सत्रच सुरू केले आहे. कोल्हापूरच्या सभेत राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांना धमकी देण्याचा इशारा दिला होता. यावर बोलताना; अशा धमक्यांना आपण जुमानत नाही; असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला; तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कीव करावी वाटते; असा समाचार आबांनी घेतला आहे.

आर. आर. पाटील माझ्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना धमक्या देतात. यापुढे लक्षात ठेवा. जर आर. आर. पाटील यांच्या लोकांकडून माझ्या लोकांना धमक्या गेल्या तर आर. आर. पाटील तुमच्या लोकांनाही माझ्याकडून धमक्या जातील. असे राज ठाकरे यांनी भर सभेत सुनावले होते. मात्र राज ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले; तर महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि यापुढेही सुरक्षित राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनींही आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर त्यांचाही समाचार आर. आर. पाटीलांनी घेतला. उद्धव ठाकरे यांची कीव येते असे म्हणत; आर. आर. पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरही बोचरी टीका केली. राज-उद्धव यांच्यावर आबांनी टीकास्त्र सोडले.

Leave a Comment