राज लहान भावासारखे वागले नाहीत: मनोहर जोशी

नाशिक: राज ठाकरेंच्या ‘एकला चलो रे’च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले. राज ठाकरे मात्र लहान भावासारखे वागले नाहीत अशी टीका मनोहर जोशींनी केली आहे.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे; असेही मनोहर जोशींनी म्हटले आहे. मनसेची भविष्यात अशीच भूमिका राहिल्यास शिवसेना मनसेशी विरोधकांसारखीच वागेल असेही जोशींनी सांगितले.

उद्धव ठाकरें यांनी हात पुढे केला. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली. राज याचे हे वागणे चुकीचे असल्याचेही जोशी यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी लग्नाबाबत केलेली टीका तर अत्यंत चुकीची असल्याचेही मनोहर जोशी म्हणाले.

मनोहर जोशींच्या या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे.

Leave a Comment