नायिकांचे कमी वयाचे पती चर्चेत

गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडमधील हिरोइन पतीची निवड करीत असताना त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या नायकाची निवड करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशास्वरूपाच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र फेमस झाली आहे. तसे पहिले तर जास्त वयाच्या हीरोइनला कमी वयाचा नायक पती म्हणून जास्तच आवडतो असे दिसते. अमृता सिंह, सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या रॉय या हिरोइनने वयाने कमी असलेल्या पार्टनर सोबत लग्न केले आहे.

काही दिवसापूर्वीच ६१ वर्षीय जीनत अमानने पुन्हा एकदा लग्न केल्याची चर्चा आहे. तिने ३६ वर्षाच्या युवकासोबत लग्न केल्याची जोरात चर्चा आहे. मात्र या सर्व प्रकारला जीनतने नंतर अफवा असल्याचे सांगितले आहे. मिस यूनिवर्स व अभिनेत्री सुष्मिता सेन पुढील वर्षी २३ वर्षाचा बिजनसमैन इम्तियाज खत्रीसोबत लग्न करणार आहे. अमृता सिंहने त्याकाळी तिच्यापेक्षा १२ वर्ष वयाने लहान असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न केले होते. त्यानंतर या दोघात घटस्फोट झाला आहे. अभिनातेत्री शिल्पा शेट्टी वयाने दोन वर्षाने लहान असलेल्या बिजनसमैन पति सोबत लग्न केले आहे.

हे सराव कमी म्हणून की काय विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने वयाने दोन वर्षाने लहान असलेल्या अभिनेता अभिषेक बच्चन सोबत विवाह केला आहे. डायरेक्टर फरहान अख्तरची पत्नी हेयरस्टाइलिस्ट असलेली अधूना त्याच्या पेक्षा वयाने सहा वर्षाने लहान आहे. तर डायरेक्टर फराह खानचा पती शिरिष कुंदर त्याच्या पेक्षा वयाने आठ वर्षाने लहान आहे.

Leave a Comment