गेल्या काही दिवसापासून राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, मंत्र्यांनी आता दुष्काळी भागाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युवक संघटना यांचे विविध भागांमध्ये दौरे सुरू होणार आहेत. यामध्ये आघाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त जालन्यात जाहीर सभा घेऊन मराठवाड्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.
तसे पहिले तर यावर्षीचा दुष्काळ भयानक आहे. त्यामुळे येत्या काळात भीषण पाणी टंचाई निराम्न होणार आहे. त्यामुळे त्यासठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतक-यांच्या वेदना समजून घेण्यासाठी सत्ताधारी मराठवाड्यात फिरकलेच नाहीत. आता अशी बैठक न घेता दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आत्ता सर्वांचे लक्ष या विशेष अधिवेशनाकडे लागले आहे.
यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि वीज बिल माफ झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणीही केली आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव यांची ही पहिलीच सभा होती.
उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख झाल्यानंतरची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे ते या सभेत काय बोलात्ता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यांनी मुद्दयालाच हात घातला आहे. त्यामुळे आता सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे त्याची उपाययोजन कार्नायची गरज आहे. त्यासाठी आगामी काळात अधिवेशन बोलवावे लागणार आहे. मात्र हे जर अधिवेशन बोलावले तर त्याचे क्रेडीट शिवसेनेला जाऊ नये यामुळे त्याची अवस्था दिवधा अशी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे दुहेरी पेच निर्माण झाला आहे.