‘मेंटल’मध्ये करिश्माच असणार सलमानची हीरोइन

बिग बॉस सीझन-६ मध्ये आपल्या सोंदर्याने प्रभावित करणा-या करिश्मा कोटकवर होस्ट असलेला सलमान खान सुद्धा प्रभावित झाला आहे. त्यामुळेच आगामी काळात येत असलेल्या ‘मेंटल’ या सिनेमात करिश्मा ही टायगर सल्लूची हीरोइन असणार आहे. सलमानची हीरोइन होण्यासाठी एकीकडे आघाडीच्या हीरोइनची रांग लागली असताना करिश्माला मात्र ही संधी सहज मिळाली आहे.

तसे पहिले तर गेल्या काही दिवसापासून याची जोरात चर्चा सुरु होती. काही जणांना या सिनेमासाठी करिश्माला सलमान संधी देईल असे वाटत होते. करिश्माने काही दिवसापूर्वीच सलमानसोबत एक जाहिरात केली होती. तेव्हापासून करिश्मा सलमानला पसंत पडली. त्यामुळेच सलमानच्या सांगण्यावरून करिश्मा बिग बॉसमध्ये झळकली. करिश्माने यापूर्वी काही सिनेमे केले आहेत. मात्र त्याचा तिला फायदा झाला नाही.

मेंटलची शू‍टिंग लवकरच सुरु होत आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होत असलेल्या सिनेमासाठी नवीन हीरोइन हवी होती. करिश्माच्या निवडीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

Leave a Comment