‘पीके’ मध्ये दिसणार अमीरचा वेगळा लूक

अभिनेता आमिर खानचा वेगळा लूक ‘पीके’ मध्ये दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमासाठी ती खूपच मेहनत घेत आहे. या सिनेमासाठी फर्स्ट लुक चांगला असावा म्हणून अभिनेता अमीर खान आतापासूनच राजस्थानमध्ये तयारीला लागला आहे.

काही दिवसापासून आमिर खानने ‘पीके’ या आगामी काळात येत असलेल्या सिनेमाची शूटिंग राजस्थानमध्ये सुरु केली आहे. शुटींगवेळी कोटच्या खाली येलो कलरचा लहंगा त्याने घातलेला दिसत होता. यावेळी त्याने हातात ट्रांजिस्टर घेतला होता. त्यामुळे मिस्टर पर्फेशनिस्टने लहंगा घालूनच या सिनेमात काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पीके’ या सिनेमात आमिर खानच्या अपोजिट अनुष्का शर्मा काम करणार आहे. गेल्या काही दिवसपासून या सिनेमाचे राजस्थानमध्ये शूट सुरु आहे. ‘पीके’ या सिनेमाच्या तयारीसाठी गेल्या महिन्यापासून अभिनेता अमिरखान राजस्थानमध्ये राहत आहे.

Leave a Comment