बिग बी’च्या गुंतवणुकीतून बेकायदेशीर बांधकाम: वाय. पी. सिंग

मुंबई: बॉलीवूडचा सर्वकालीन शहेनशहा अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक असलेली रियाल्टी कंपनी अंधेरी येथे ग्रीन झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी केला.

एक्स्टसी रियाल्टी’ ही कंपनी अंधेरी येथे व्यावसायिक इमारत उभी करीत असून प्रत्यक्षात त्या जागेवर ग्रीन झोनचे आरक्षण आहे. या कंपनीत अमिताभ यांची साडेसहा कोटी तर जया बच्चन यांची ५ कोटी रुपये गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीची माहिती ज्या बच्चन यांनीच उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञा पत्रात दिली आहे; असा दावा सिंग यांनी केला. ही माहिती सिंग यांनी माहितीच्या अधिकारात मिळविली आहे.

अर्थात हे बांधकाम बेकायदेशीर असल्याची माहितीच अमिताभ आणि जया बच्चन यांना नसण्याची शक्यताही सिंग यांनी व्यक्त केली. या बांधकामाबाबत महापालिका, पोलीस आणि राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे करणार असल्याचेही सिंग म्हणाले.

Leave a Comment