यवतमाळ – अपघातात निधन झालेले काँग्रेसचे आमदार नीलेश पारवेकर यांच्या मृतदेहावर शोकाकूलवातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मतदारसंघात भेट देऊन परतत असताना, त्यांच्या गाडीला रात्री उशिरा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पारवेकर यांचे क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पारेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य दोघे जण त्यांच्या गाडीत होते. ते दोघेही जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार पारवेकर हे मतदारांना भेटण्यासाठी मतदारसंघात गेले होते. त्यावेळी परतताना त्यांच्या गाडीसमोर रानटी जनावर आल्याने हा अपघात झाला. जनावर मधेच आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी उलटल्याने, गाडीतील तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आमदार पारवेकर यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे यवतमाळमध्येच असल्याने घटनेची माहिती मिळताच, पवारांनीही रुग्णालयात जाऊन पारवेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.