दीपिकाला भेटण्यासाठी रणवीर गेला दुबईला

’रामलीला’ या सिनेमाची शूटिंग सुरु झाली तेंव्हा पासून अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या प्रेम लीलाची सर्वत्र जोरात चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसपासून तर अभिनेता रणवीर कुठल्याही हीरोइन सोबत काम केल्यानंतर त्याचे नाव त्या अभिनेत्रिशी जोडले जात आहे. आता तेच हाल दीपिका पादुकोणचे झाले आहेत

काही दिवसापूर्वीच दीपिका ‘ रेस-२’ च्या प्रमोशनसाठी दुबईला गेली होती. त्यावेळी रणवीर सिंह तिला भेटन्यासाठी दुबईला गेला होता. रणवीर जरी म्हणत असला तो शॉपिंगसाठी दुबईला गेला होता. मात्र सूत्रोंने दिलेल्या महितिनुसार तो दीपिकाला भेटण्यासाठी गेला होता. रणवीरने दुबईला गेल्यानंतर लगेचच ‍दीपिकाशी संपर्क साधला.

त्यानंतर दीपिका आणि रणवीरने मिळून खूप काही अशी शॉपिंग केली. त्यानंतर दोघांनी मिळून डांस फ्लोरवर खूप डान्स केला. त्यशिवाय दोघांनी डिनरचा आनंद घेतला. रणवीरने त्यावेळी त्याच्या काही दोस्तनादेखील सोबत नेले होते. सूत्रोंना दिलेल्या माहितीनुसार दोघेजण यंग आहेत. त्याशिवय ते जवळचे दोस्त आहेत.