अल कायदाशी टक्कर देण्यासाठी सोशल मिडीया -हिलरी

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवपदावरून पायउतार होतानाच हिलरी किलंटन यांनी अलकायदा आणि अन्य जिहादी संघटनांशी मुकाबला करण्यासाठी इंटरनेट आणि ट्वीटरसारख्या सोशल साईटचा वापर अमेरिका करेल असे जाहीर केले आहे. हिलरी यांनी स्थापन केलेल्या दोन संस्थांमार्फत हे कार्य केले जाईल असे समजते.

यावेळी बोलताना हिलरी म्हणाल्या की इंटरनेट व सोशल मिडीयाच्या माध्यामतून अल कायदा आणि अन्य इस्लामिक जिहादी दहशतवादी संघटना अमेरिकेविरोधात विखारी प्रचार करत आहेत. इंटरनेट आणि सोशल मिडिया हे त्यासाठी मोठे शस्त्र ठरले आहे तर आम्हीही हेच शस्त्र वापरून त्यांचा मुकाबला करणार आहोत. आम्हीही याच माध्यमांतून अल कायदा व तत्सम संघटनांविरोधात प्रचाराचे अस्त्र उगारणार आहोत. या संघटनांच्या आवाहनांना आम्हीच प्रतिसाद देणार आहेात. त्यांनी अमेरिकन किती टेरिबल आहेत याचे व्हिडीओ किलपिंग टाकले तर आम्हीही हे दहशतवादी किती क्रूर आहेत याचे व्हिडीओ प्रसिद्ध करणार आहोत.

आंतरराष्ट्रीय कम्युनिझम विरोधी शीतयुद्धात मिडिया टॅक्स्टीक्सचा वापर आम्ही केला होता आणि तो अत्यंत प्रभावी ठरला होता.२०१३ सालात पुन्हा एकदा हाच मार्ग आम्ही चोखाळणार असून सर्व जगातील जनतेशी कम्युनिकेशन साधणे इंटरनेट आणि सोशल साईटमुळे सहज शक्य होत आहे आणि त्याचा उपयोग करून घ्यायलाच हवा असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment