मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ‘पक्षप्रमुख’ पदाची सूत्र स्वीकारली. यानंतरच्या काळात संघटना बांधणीच्या दृष्टीने संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार, पदाधिकारी असे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उद्धव यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच ही निवड लोकशाही प्रक्रियेने करण्यात आली. यावरून शिवसेनेच्या आगामी वाटचालीतील कार्यपद्धतीच्या बदलांची नांदी झाल्याचे मानले जात आहे.