‘थ्री इडियट्स’ला भारी पडणार ‘पीके’

गेल्या काही दिवसपासून बरीच प्रसिद्धी मिळाल्याने अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या हवेत आहे. येत्या काळात ती आमीर खान आणि राजकुमार हीरानी यांच्या टीम सोबत ‘पीके’ या नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे. या सिनेमाची शुटींग पुढील महिन्यात सुरु होणार आहे. ‘थ्री इडियट्स’या सिनेमापेक्षाही ‘पीके’ हा सिनेमा भारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनुष्काच्या मते ‘पीके’ हा सिनेमा आमिर-हीरानी जोड़ीच्या ‘थ्री इडियट्स’ तुलनेत हिट होण्याची शक्यता अधिक आहे. या सिनेमासाठी अनुष्काला साईन करण्यात आल्याने ती सध्या खूपच खुश आहे. ‘पीके’ या सिनेमाची कहानी खूपच रोचक असी आहे. त्यामुळे या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षक तिच्या या सिनेमाशी जोडले जातील असे तिला वाटते.’ थोडाशा वेगळ्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली असल्याने अनुष्का या संधीचे सोने करणार असे दिसत आहे.

काही दिवसापूर्वीच रिलीज झालेला तिचा ‘मटरू की बिजली का मन्डोला’ हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे सध्या ती सातव्या आसमानवर आहे. ‘पीके’ या सिनेमात आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या शिवाय अभिनेता अरशद वारसी सुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Leave a Comment